Pune School: पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार

Pune School: पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार

Published by :
Published on

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता त्यातच ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. मात्र आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पुण्यातसुद्धा कोरोना (Corona cases in Pune) बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पुण्यातील शाळांबाबत (Pune School)  एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू (Pune School colleges reopen) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जात होते. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पुण्यातील कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) म्हणाले, कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता घट होत आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे . अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

यासोबतच टीईटी घोटाळा प्रकरणी बोलाताना सांगितले की, टीईटी घोटाळा चौकशीत सरकारच्या बाजुने कोणताही हस्तक्षेप केला जाणार नसून टीईटी घोटाळा चौकशी प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com