India
EPFO चा कर्मचाऱ्यांना झटका: व्याजदारात मोठी कपात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरांची (EFP Interest Rates) घोषणा करण्यात आली आहे. ईपीएफओ (EPFO) ने व्याजदारात कपात करुन तमान नोकरदारांना मोठा झटका दिला आहे. तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 8.5 टक्के होता. त्यात कपात करुन आता तो 8.1 करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षातील हे सर्वात कमी व्याजदर आहेत.
असे कमी होत गेले व्याजदर
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ सब्सक्रायबर्सना 8.65 टक्के व्याज मिळत होते. त्यापुर्वी 2016-17 मध्ये हे व्याज 8.65 टक्क्यांनी मिळत होते. 2017-18 आणि 2015-16 साठी व्याजदर 8.8 टक्के होता. 2013-14 साठी पीएफच्या रकमेवरील व्याजदर 8.75 टक्के होता.