केंद्राच्या आयात धोरणांचा निषेध; राज्यमंत्री बच्चू कडू यांचे टाळी आणि थाळी नांद आंदोलन
केंद्र शासनाच्या आयात धोरणाविरोधात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी केंद्राच्या धोरणाचा निषेध केला.
खतांच्या वाढलेल्या किमती आणि तूरडाळ,उडीत,मुंग या धान्याच्या आयात धोरणा विरोधात आज अमरावतीच्या राजकमल चौक टाळी आणि थाळी नांद आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात प्रहारने शोले स्टाईल आंदोलन केले. वर्ध्याच्या गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवर टाळी आणि थाळी वाजवत आंदोलन करण्यात आले आहे.
देशात 45 लाख टन इतकी तूर आहे. याशिवाय इतरही कडधान्य शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. असे असताना कडधान्य आयात करण्याचा कट भाजप पक्षाच्या केंद्र सरकारचा आहे. ही आयात थांबली पाहिजे, शेतीपिकाला देशात योग्य भाव मिळाला पाहिजे, रासायनिक खतांचे भाव कमी करा अशाच मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेधार्थ आज परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेताच्या बांधावर थाली बजावो टाली बजावो आंदोलन घेण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.