adar-poonawalla
adar-poonawalla

Adar poonawalla | अदर पूनावाला यांना दिली जाणार वाय दर्जाची सुरक्षा

Published by :
Published on

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला भारतात परतले आहेत. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली होती. यानंतर वाय दर्जाची सुरक्षा त्यांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान ते आता पुण्यात परतले असून हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकीकडे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सीरमच्या कोव्हिशिल्ड लसीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण असताना यादरम्यानच मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर परतणार असल्याचे अदर पूनावाला यांनी सांगितले होते.

फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये सीरमची गणती होते. कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सीरम करत असून आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे. सीरम केंद्र सरकारला ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com