Police Recruitment 2021 | पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Police Recruitment 2021 | पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Published by :
Published on

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) मोठ्या संख्येने कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) आणि रायफलमॅन (जनरल ड्यूटी) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत एकूण 25,271 जागा भरण्यात येणार आहेत. 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भरतीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भातील नोटिफिकेशन आधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जारी करण्यात आले आहे.

इच्‍छुक उमेदवार वेबसाइटवर अथवा आपल्या मोबाइल फोनवर 'UMANG App'च्या माध्यमाने अर्ज करू शकतात. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF), भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB) सह इतरही काही सुरक्षा दलांतील या 25 हजार 271 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या रिक्त पदांसाठी 17 जुलैलाच नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट निर्धारित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी यशस्वीपणे अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची सर्वप्रथम टियर 1 लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेची तारीख सप्टेंबर महिन्यात जारी केली जाईल.

शैक्षणिक आर्हता – अर्ज करण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांना 10वीची परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 23 वर्षांदरम्यान असावे.

याशिवाय इतर माहिती, जसे वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आदी माहिती आपण नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com