Fumio Kishida (PM of Japan)
Fumio Kishida (PM of Japan)

जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Published on

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japan PM Fumio Kishida) हे जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ह्या दौऱ्यावर असताना येत्या 5 वर्षांत भारतामध्ये 42 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीची घोषणा करण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.

भारताला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या निर्णयावर किशिदा सहमत होऊ शकतात असे मत ' निक्केई' ह्या जपानी वृत्तसंस्थेने व्यक्त केले आहे. जपानी कंपनींच्या भारतातील गुंतवणूकीबाबतही किशिदा बोलण्याची शक्यता आहे. 2014 साली शिंजो आबे (Shinjo Aabe) हे जपानचे पंतप्रधान असताना त्यांनी भारतात 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता किशिना साधारण 5 ट्रिलियन येन इतक्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com