लष्करी हेलिकॉप्टर अपघात; पंतप्रधानांनी तातडीने बोलावली केंद्रिय सुरक्षा समितीची बैठक
तामिळनाडूतील कुन्नूर येथील लष्करी हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनआयए या वृत्त संस्थेकडून हाती येत आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची एक बैठक बोलावली आहे. केंद्रिय सुरक्षा समितीची ही बैठक आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे MI17V5 विमान कोसळले. भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ लष्करी अधिकारी उपस्थित होते. या अपघातात मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी आहेत.
बिपीन रावत यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमिवर बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची एक बैठक बोलावली आहे. केंद्रिय सुरक्षा समितीची ही बैठक सायं.6.30 वाजता सूरू होणार आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.