स्वतांत्र्यादिनापुर्वी पंतप्रधानांची मोठी घोषणा…

स्वतांत्र्यादिनापुर्वी पंतप्रधानांची मोठी घोषणा…

Published by :
Published on

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन रविवारी साजरा होणार आहे.त्यासाठी संपूर्ण देश उत्सहात आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली आहे.१४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृतिदिन' म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.

"देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत १४ ऑगस्टला 'फाळणी वेदना स्मृतिदिन'म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे". असं नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे म्हटल आहे.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. पाकिस्तानात १४ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो."हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील" असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com