पंतप्रधानांनी लाँच केलं Ayushman Bharat Digital Mission; जाणून घ्या योजनेबाबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज डिजिटल आरोग्य मिशन लाँच केलं. या मोहिमेसाठी सरकारनं ऐतिहासिक करार केला आहे आणि याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असे आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर एक आधार प्रमाणेच नंबरही असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल.
पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. सध्या ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात असून 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याची अंमलबजावणी होत आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ होईल. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित राहणार आहेत.
- असा तयार करा हेल्थ आयडी
- पब्लिक कम्युनिटी हॉस्पीटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, हेल्थ अँड वेलनेस सेंटर किंवा असा हेल्थकेअर प्रोवाडर जो नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडलेला असेल, ते कोणत्याही व्यक्तीचा हेल्थ आयडी तयार करू शकातात.
- याशिवाय https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही नोंदणीही करू शकता आणि आपलं हेल्थ आयडी तयार करू शकता.
- काय आहे फायदा?
- युनिक हेल्थ आयडीमुळे रुग्णांना डॉक्टरांकडे जाताना फाईल्स सातत्यानं नेण्यापासून सुटका मिळेल. तसंच डॉक्टरांनाही नंबरच्या सहाय्यानं रुग्णांचा डेटा पाहण्यास आणि त्यांची माहिती घेण्यास माहिती मिळेल. याच आधारावर रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहे. तसंच संबंधित व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो हेदेखील त्यावरून समजणार आहे.
या हेल्थ कार्डसाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक घेतला जाईल. याच्या सहाय्यानं मोबाईल हेल्थ कार्ड तयार केलं जाणार आहे. यासाठी सरकार एक हेल्थ अथॉरिटी बनवेल जे व्यक्तीचा डेटा गोळा करणार आहे. ज्या व्यक्तीला हेल्थ आयडी तयार करायचं आहे त्याच्या रेकॉर्ड जमा करण्याची हेल्थ अथॉरिटीकडून परवानगी देण्यात येईल.