PM KISAN Yojana | मोदींकडून पीएम किसानचा 8 वा हप्ता जारी

PM KISAN Yojana | मोदींकडून पीएम किसानचा 8 वा हप्ता जारी

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता जारी केला आहे. यानुसार 9.5 कोटी लाभार्थ्यांना 19000 कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत. थोड्याच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आठव्या हप्त्याचे 2000 रुपये पोहोचणार आहेत.

या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लोकांनाच होणार आहे.

पैसे आले का? असे चेक करा

  • पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
  • वेबसाईटच्या उजव्य़ा बाजुला Farmers Corner वर क्लिक करा.
  • Farmers Corner च्या खाली Beneficiary Status चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
  • यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यावर तुमचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर चा पर्याय निवडा.
  • यानंतर जो पर्याय येईल त्यावर तुमही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर 'Get Data' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व हप्त्यांची माहिती मिळेल.

PM Kisan वर Loan
पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com