पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग ११ व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर
वाढत्या इंधनदरांमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक चितेंत असताना सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढलं आहे. यासोबतच दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून लोकांनी प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत.
तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपये ६२ पैसे आणि डिझेलचा दर ८७ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलसाठी ९१ रुपये ४१ पैसे तर डिझेलसाठी ८४ रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. बंगळुरुत हाच दर पेट्रोलसाठी ९३ रुपये २१ पैसे आणि डिझेलसाठी ८५ रुपये ४४ पैसे इतका आहे.
मुंबईत गुरुवारी पेट्रोलचा दर ९६ रुपये ३२ पैसे तर डिझेलचा दर ८७ रुपये ३२ पैसे इतका होता. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे..