Pegasus spyware: ”केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पदावरून हकालपट्टी करा”; काँग्रेस आक्रमक
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि दोन मंत्र्यांची हेरगिरी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.या काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
पेगासस स्पायवेअरद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.काँग्रेसने राहुल गांधींची हेरगिरी केल्याचा भाजपवर आरोप केला. केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही हेरगिरी करण्यात आली आहे. राहुल गांधी, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने त्यांचे केंद्रीय मंत्री, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी केली. हे अतिरेकीपणाचं लक्षण नाही का?, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.
सुरजेवाला आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हेरगिरीचं प्रकरण पुढे आल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. शहा यांना गृहमंत्रीपदावरून बरखास्त केलं जावं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.