बापरे; मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईतही संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. आज तब्बत १ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची व आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
मुंबईत मंगळवारचा अपवाद वगळता आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत एक हजारच्या पुढे वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज १,१४५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. म्हणजे बुधवारच्या तुलनेत आज किंचित रुग्णवाढ कमी आहे.
सध्या ८,९९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ३ लाखाहून जास्त रुग्ण कोरोनामधुन बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९४ टक्के आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाखाहून जास्त रुग्ण कोरोनामधुन बरे झाले आहेत.
लक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले. इंग्रजी वृत्तपत्राने असे वृत्त दिले आहे.