Dill Leaves Benefits
Dill Leaves Benefits Team Lokshahi

Dill Leaves Benefits : शेपूची भाजी खाण्याचे 'हे' आहेत गुणकारी फायदे

पालेभाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पालेभाजी म्हटल की, आपल्या समोर एक नाव येते ते म्हणजे शेपू.
Published by :
shamal ghanekar
Published on

पालेभाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पालेभाजी म्हटल की, आपल्या समोर एक नाव येते ते म्हणजे शेपू (Dill Leaves) . शेपूची भाजी खाल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. शेपूची भाजी खाल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आणि पोटही साफ राहण्यास मदत होते. शेपूच्या भाजीचा येणारा तो विशिष्ट वास यामुळे अनेकजण ही भाजी खाणे टाळतात. तसेच ही भाजी खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.

Dill Leaves Benefits
Cardamom Of Benefits : तोंडातील दुर्गंधीसाठी वेलची आहेत फायदेशीर

शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी (vitamin C) असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे आपल्या पचनक्रियेला चालना मिळते. तसेच यामध्ये कॅल्शियम असते जे आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे शेपूच्या भाजीचा आपल्या आहारात समावेश करा.

शेपूच्या भाजीचे सेवन केल्याने आपल्या होणारा गॅस आणि पोटदुखीच्या समस्यापासून दूर होण्यास मदत करते.

काही लोकांना झोप पुर्ण न होणे किंवा खूप वेळा झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप न लागणे अशा समस्या जर आपल्याला त्रास देत असतील तर शेपूच्या भाजीचे सेवन करा. कारण त्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी असते, हा आजार दूर करण्यास मदत करते.

आपले वाढते वजन कमी करण्यासाठी शेपूची भाजी हे उत्तम उपाय आहे. शेपू अ‍ॅन्टी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतात असून कॅलरीचे प्रमाण कमी असते. जर तुम्ही रोज ग्रीन टी पित असाल तर त्यामध्ये शेपूची पाने मिक्स करून त्याचे सेवन करा. ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com