Sohan Halwa
Sohan Halwa Team Lokshahi

Sohan Halwa Recipe : घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा अजमेरचा फेमस सोहन हलवा

सणांचा महिना सुरु झाला की सगळ्यानां सगळ्यात आधी आठवते ते म्हणजे मिठाई
Published by :
shweta walge
Published on

सणांचा महिना सुरु झाला की सगळ्यानां सगळ्यात आधी आठवते ते म्हणजे मिठाई. कारण मिठाईशिवाय सर्व सण अपूर्ण आहेत. भारतीय मिठाईमध्ये अनेक मिठाई आहेत, ज्या लोकांना खायला खूप आवडतात. तर आज आपण जाणून घेउया अश्यात एक मिठाईची रेसिपी. जी खायला खूप चविष्ट असेल.

सोन हलव्यासाठी साहित्य

सोहन हलवा बनवण्यासाठी तुम्हाला- मैदा - 1/2 किलो, साखर - 1/2 किलो, बदाम - 1/4 किलो, तूप - 1/2 किलो, दूध - 1 कप, पिस्ता - 100 ग्रॅम, बेदाणे - 5-6, काजू - 5-7, हिरवी वेलची - 5-7.

सोहन हलवा बनवण्याची पद्धत-

सोहन हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात एक लिटर पाणी गरम करा. आता त्यात साखर घाला, साखर वितळल्यानंतर त्यात एक कप दूध घाला. ५ मिनिटे शिजू द्या. आता स्वच्छ कापडाने गाळून घ्या. नंतर उरलेले पाणी आणि साखरेचा पाक मिक्स करा. यानंतर मैद्याचे पीठ घेऊन ते थोडे पाण्यात मिसळा, नंतर मंद आचेवर शिजवा. आता पीठ घट्ट होऊ लागले की त्यात एक मोठा चमचा तूप घाला. सतत ढवळत राहा म्हणजे ते चिकटणार नाही. काही वेळाने हे तुपाचे मिश्रण वेगळे दिसू लागेल. यावरून समजून घ्या की ती तयार झाली आहे.

आता त्यात ड्राय फ्रुट्स म्हणजे बदाम, पिस्ता आणि हिरवी वेलची घाला. आता तूप लावल्यानंतर हे मिश्रण ट्रे किंवा प्लेटमध्ये काढून पुडिंगसारखे पसरवा.बदाम, पिस्ता, काजूने सजवा. नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. आता ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com