Shravan: श्रावणात बनवा हळदीच्या पानावर वाफवलेल्या गोड पातोळ्या

Shravan: श्रावणात बनवा हळदीच्या पानावर वाफवलेल्या गोड पातोळ्या

पातोळ्या हा पदार्थ कोकणात केला जाणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ गौरीगणपती, नागपंचमी आणि श्रावणात केला जाणारा पदार्थ आहे, जो या सणांमध्ये गोडाचे नैवेद्य म्हणून केले जाते. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे यादरम्यान आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय हळदीच्या पानावर वाफवलेल्या गोड पातोळ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

पातोळ्यासाठी लागणारे साहित्य:

गुळ

हळदीचे पानं

ओल्या खोबऱ्याचा किस

तांदळाचे पीठ

तूप

वेलची पूड

खसखस

केशर

पातोळ्या बनवण्याची कृती:

सर्वात आधी कढईत तूप घालून त्यात किसलेल खोबर, गूळ, वेलची पूड, खसखस, केशर हे सर्व घालून एकत्रीत करावे. यानंतर तांदळाचे पीठ घेऊन त्यात पाणी आणि मीठ घालून पीठ भिजवून घ्या. यानंतर हळदीच्या पानांना तूप लावा आणि तयार केलेले तांदळाचे पीठ चमच्याने पसरून घ्या आणि त्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूवर गुळ आणि ओल्या खोबऱ्याचे तूपात तयार केलेल सारण पसरून घ्या आणि पान दुमडून घ्या. त्याचसोबत एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.

यानंतर चाळणीमध्ये हळदीची पानं भरून ठेवा. ती चाळणी गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवा आणि त्याचावर झाकण ठेवा. यानंतर पातोळ्या 15 ते 20 मिनिटं उकडून घ्या. उकल्यानंतर हळदीचे वरचे दुमडलेले पान बाजूला करा आणि गरम-गरम गोड पातोळ्या तयार होतील अशा प्रकारे तुम्ही या पातोळ्यांचा आनंद घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com