Shravan: श्रावणात साबुदाणा खिचडी नको, तर स्वादिष्ट साबुदाणा रबडी बनवण्यासाठी जाणून घ्या 'ही' रेसिपी

Shravan: श्रावणात साबुदाणा खिचडी नको, तर स्वादिष्ट साबुदाणा रबडी बनवण्यासाठी जाणून घ्या 'ही' रेसिपी

श्रावण सुरु झाला आहे आणि अनेक लोक यादरम्यान उपवास करतात. उपवासादरम्यान बरेच लोक तेलात बनवलेली साबुदाणा खिचडी खातात. पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय श्रावण उपवासासाठी स्वादिष्ट साबुदाणा रबडी एकदा करून पाहाच.
Published by :
Team Lokshahi
Published on

साबुदाणा रबडीसाठी लागणारे साहित्य:

साबुदाणे

दूध

साखर

वेलची पूड

काजू बदाम

केळी

चेरी

गुलाबाच्या पाकळ्या

डाळिंब

केशर

सफरचंद

साबुदाणा रबडीची कृती:

सर्वात आधी साबुदाणा पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा. यानंतर दूध थोडं तापल्यावर त्यात साबुदणा घाला आणि तो घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. यानंतर गॅसवरील मिश्रणात साखर, वेलची पूड घालून मिश्रण छान मिक्स करून घ्या. यानंतर त्यात क्रीम आणि चिरलेले सफरचंद तसेच केळी घाला आणि त्यात केशर घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर संपूर्ण मिश्रण फ्रिजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थोड्या वेळाने मिश्रण थंड झाल्यावर ते बाहेर काढा आणि अशा प्रकारे स्वादिष्ट साबुदाणा रबडी तयार होईल. सजावटीसाठी त्यावर चेरी, डाळिंबांचे दाणे आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरा आणि स्वादिष्ट साबुदाणा रबडी सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com