Recipe: ओव्हनशिवाय घरीच बनवा पिझ्झा, अगदी बाजारासारखा येईल चव
पिझ्झा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. पण प्रत्येक वेळी बाहेरच्या जंक फूडपासून मुलांना वाचवायचे असेल तर तुम्ही घरीही पिझ्झा बनवू शकता. आता ओव्हनशिवाय पिझ्झा कसा तयार होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेव्हा ओव्हनशिवाय तव्यावर बनवलेला हा पिझ्झा करून पहा. त्याची चव ओव्हन पिझ्झा पेक्षा कमी नसेल. चला तर मग जाणून घेऊया तव्यावर टेस्टी आणि चीझी पिझ्झा कसा बनवायचा.
तव्यावर पिझ्झा बनवण्याचे साहित्य
दोन कप ऑल पर्पज मैदा, एक टीस्पून यीस्ट, चवीनुसार मीठ, दोन बेबी कॉर्न, सिमला मिरची, दोन चमचे पिझ्झा सॉस, मोझेरेला चीज, मिक्स्ड हर्ब्स, ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे साखर.
तव्यावर पिझ्झा कसा बनवायचा
पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पीठ चाळून घ्या. त्यात मीठ आणि साखर घाला. यीस्टला एक्टिवेट करुन घ्या. यासाठी एका भांड्यात यीस्ट घ्या आणि त्यात कोमट पाणी टाका. साधारण दहा मिनिटांनी हे पाणी पिठात घालून कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ झाकून ठेवा आणि पिठाच्या वर तेल लावा. साधारण दोन तासांनी पीठ बाहेर काढून तळहाताच्या साहाय्याने थोडे अजून मळून घ्या. नंतर त्याचे पीठ घेऊन अर्धा सेमी जाडीच्या रोटीमध्ये लाटून घ्या. ही रोटी हव्या त्या आकारात लाटावी. नॉनस्टिक पॅनला तेल लावून गॅसवर गरम करा. रोटीला पॅनवर सोनेरी भाजून घ्या. एका प्लेटच्या सहय्याने रोटीला झाका. याने रोटी दोन्ही बाजूने शिजेल आणि रोटी फूगेल.
आता या बेस वर आधीच तयार भाज्या ठेवा. प्रथम पिझ्झा बेस वर पिझ्झा सॉस लावा. तसेच शिमला मिरची, पनीर, कांदा, टोमॅटो, बेबी कॉर्न आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या तयार ठेवा. पिझ्झा सॉस लावल्यानंतर या भाज्यांचा थर पसरवा वर चिच टाका आणि झाकण शिजवा. चीज पूर्णपणे वितळल्यावर पिझ्झा गॅसवरून उतरवा. चाकूच्या मदतीने त्याचे तुकडे करा. मिक्स्ड हर्ब्स आणि केचपने सजवून गरमागरम सर्व्ह करा.