भाऊबीजेला भावाचे तोंड गोड करण्यासाठी बनवा 'हे' छान गोडाचे पदार्थ
भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस.
श्रीखंड
तुम्ही चक्का बाजारातून विकत आणून तो साखरेसोबत फेटून घ्या. वेलची, केशर, पिस्ता, बदाम ज्या फ्लेवर मध्ये तुम्हांला श्रीखंड बनवायचे आहे ते बनवू शकता.
खोबर्याचे लाडू
खोबर्याचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. कंडेन्स मिल्क किंवा पाकामध्ये नारळाचा किस मिसळून तुम्ही खोबर्याचे लाडू बनवू शकता.
काजू पिस्ता रोल
काजू पिस्ता रोल साठी या सुकामेव्यांची पूड आणि पिठीसाखर एकत्र करून शिजवा. मिश्रण ओलं असतानाच बटर पेपर वर थापून त्याच्या वड्या करा. सिल्वर वर्ख सोबत सजवून सर्व्ह करा.
खव्याची बर्फी
खवा हा सणासुदीच्या काळात हमखास घराघरात गोडाच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. खव्याची बर्फी करण्यासाठी तूप, साखर, खवा आणि ड्राय फ्रुट पावडर एकत्र करा आणि बर्फी बनवा.
गुलाबजाम ट्विस्ट
गुलाबजाम आपण अनेकदा खाल्ले असतील पण त्याला थोडा ट्विस्ट देण्यासाठी शॉर्ट ग्लास मध्ये फेटलेलं क्रीम, कंडेन्स मिल्क, दही एकत्र करा. ग्लासमध्ये अर्ध भरा. त्यावर गुलाबजाम टाकून बेक करा. थोड्या वेळाने त्यावर श्रीखंड टाकून सर्व्ह करू शकता.