Potato Recipe
Potato RecipeTeam Lokshahi

डाळ-भातासोबत खाण्यासाठी काही कुरकुरीत पाहिजे? ट्राय करा ही रेसिपी

प्रत्येकाच्या घरात डाळ-भात हा पदार्थ बनतोच. पण प्रत्येकाची डाळ-भात खाण्याची पद्धत वेगळी असते.
Published by :
shweta walge
Published on

घरच जेवण म्हणजे स्वर्ग. प्रत्येकाच्या घरात डाळ-भात हा पदार्थ बनतोच. पण प्रत्येकाची डाळ-भात खाण्याची पद्धत वेगळी असते. काही जण डाळ-भातासोबत पापड, लोणचं, भाजी, चकली, कुरकुरीत चीप्स असे अनेक पदार्थ खातात. असाच एक कूरकूरीत पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने तुमचा डाळ-भात अजून स्वादिष्ट आणि मजेदार होणार आहे.

बटाट्याचे कातरण बनवण्याचे साहित्य

बटाटा- 4

तेल तळण्यासाठी

धने-जीरे पावडर

लाल मिरची

मीठ

Potato Recipe
पिझ्झाची क्रेविंग होतीयं, तर घरीच बनवा झटपट पिझ्झा पॉकेट्स; जाणून घ्या रेसिपी

बटाट्याचे कातरण बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम बटाट्यांची सालं काढून बारीक कापून घ्या. त्यानंतर बटाट्यांची काप पाण्यात चांगली धुवून घ्या.

एका कढईत तेल तापवायला ठेवा. तेल चांगले तापल्यानंतर त्यात कापलेले बटाटे टाका. मंद आचेवर बटाट्याचे काप चांगले खरपूस तळून घ्या. त्यानंतर बटाट्याचे काप तेलामधून काढून घ्या. त्यानंतर दुसरं भांड मंद आचेवर तापवायला ठेवा आणि त्यात ते तळलेले बटाट्याचे काप टाका आणि त्यात लाल मिरची, धने-जीरे पावडर आणि मीठ टाका आणि गॅस बंद करा. कातरण डाळ-भातासोबत खाण्यास तयार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com