सकाळच्या नाश्त्याला अनेकजण ओट्स खातात मात्र आज आम्ही तुम्हाला ओट्सपासून पराठे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
ओट्स
गव्हाचे पीठ
चमचा जिरे
कांदा
आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट
लसूण
पाणी
तेल
चवीनुसार मीठ
ओट्स आणि गव्हाचे पीठ मऊ मळून घ्या आणि त्या पीठाचे गोळे करुन घ्या. तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, कांदा, आले-हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसूण घालून चांगले भाजून घ्या. त्यात मीठ टाका. सारण तयार आहे. आता पीठाच्या गोळ्यात सारण भरुन लाटून घ्या. एक तवा गरम करा. प्रत्येक पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या. सर्व्ह करा