Crispy Tandoori Chicken Roll: अगदी घरच्या साहित्यांमध्ये तयार करा क्रिस्पी तंदुरी चिकन रोल

Crispy Tandoori Chicken Roll: अगदी घरच्या साहित्यांमध्ये तयार करा क्रिस्पी तंदुरी चिकन रोल

आजच एक अतिशय चवदार मांसाहारी चिकन स्टार्टर बनवा. चिकनपासून अनेक पाककृती बनवल्या जात असल्या तरी तंदूरी चिकन काही वेगळेच आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आजच एक अतिशय चवदार मांसाहारी चिकन स्टार्टर बनवा. चिकनपासून अनेक पाककृती बनवल्या जात असल्या तरी तंदूरी चिकन काही वेगळेच आहे. घरी सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही ते ओव्हनमध्ये देखील बनवू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम उत्तम योग्य आणि हिरव्या चटणीसोबत खाल्ल्यास उत्तम चव येते.

चिकन मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य:

4 नग चिकन ब्रेस्ट, 2 मोठे चमचे लिंबाचा रस, 2 मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे घट्ट दही, 2 मोठे चमचे तंदूरी मसाला, 1 मोठा चमचा बेसन, 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा धणेपूड, 1/2 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी, 1 छोटा चमचा कश्मिरी लाल तिखट, 1/4 छोटा चमचा काळीमिरी पूड, 2 मोठे चमचे मोहरी तेल, 1 मोठा चमचा बटर आणि चवीनुसार मीठ.

स्टफिंगसाठी लागणारे साहित्य:

3 कप चिरलेला पालक, 1/2 कप मोझरेला चीज, 1/2 कप पारमेसन चीज, 1 मोठा चमचा चिरलेला लसूण, 1/4 छोटा काळीमिरी पूड, चवीनुसार मीछ, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, ग्रिल करण्यासाठी थोडे बटर.

तंदुरी चिकन रुलाड बनवण्याची कृती:

प्रथम चिकनचा ब्रेस्ट पीस घेऊन त्याला मधून चीरा. तो पीस पूर्ण कापू नका. तो तुकडा उघडला गेला पाहिजे. चिकनचा तुकडा मीठ हॅमरने ठोकून सपाट करून घ्या. आधी मॅरीनेशनचे साहित्य एकत्र करून त्यात चिकन मॅरीनेट करा. एका पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करुन त्यात चिरलेला लसूण घाला. कच्च्या लसणाचा वास जाईपर्यंत लसूण परतून घ्या.

पॅनमध्ये चिरलेला पालक, काळीमिरी आणि मीठ घालून 2-3 मिनिटे परतवत राहा. मग ते थंड करा. थंड झालेल्या पालकमध्ये मोझरेला चीज घालून चांगले एकजीव करा. चिकनचा तुकडा परत सपाट करुन त्यावर पालकचे मिश्रण पसरवा. चिकनचा तुकडा रोल करुन सुतळीने बांधून 2 तास फ्रिजमध्ये ठेवा. ओव्हन 190 अंश सेल्सिअसवर प्रीहीट करुन घ्या. एका पॅनमध्ये बटर घालून वितळवा. मग चिकनचा रोल केलेला तुकडा बटरमध्ये प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 15 मिनिटांसाठी ग्रिल करा. थंड झाल्यावर सुतळ काढून सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com