चटकदार
कोणत्याही आनंदाच्या क्षणाला रव्याच्या शिऱ्या ऐवजी बनवा बदामाचा हलवा
कोणताही आनंदाच्या क्षणाला किंवा सणाला आपण गोड पदार्थ म्हणून रव्याचा शिरा करतो. पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय साध्या आणि सोप्या पद्धतीत तयार होणारा बदामाचा हलवा.
बदामाचा हलवा बनवण्याचे साहित्य:
बदाम
दूध
साखर
वेलची
केसर
काजू
बदामाचा हलवा बनवण्याची कृती:
बदामाचा हलवा बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे बदाम पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी भिजत ठेवलेल्या बदामाची साल काढून घ्या पाण्यात भिजवल्यामुळे बदामाची साल सहज काढली जाते. साल काढलेले बदाम एका वाटीत काढून घ्या. सोललेले बदाम आणि दूध एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा.
नॉन-स्टिक पॅनमध्ये साखर आणि वेलचीसह बदाम आणि दूध यांची तयार केलेली पेस्ट टाका आणि त्याचा रंग हल्का ब्राऊन होईपर्यंत ते मिश्रण भाजून घ्या. यानंतर मिश्रणावर बारीक केलेले काजू, बदाम आणि केसर सजावटीसाठी टाका आणि बदाम हलवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे तुमचा गोड आणि स्वादिष्ट बदामाचा हलवा तयार होईल.