प्रथिनेयुक्त स्वादिष्ट आणि चमचमीत मूग डाळ इडली कशी करायची जाणून घ्या...

प्रथिनेयुक्त स्वादिष्ट आणि चमचमीत मूग डाळ इडली कशी करायची जाणून घ्या...

आरोग्याची काळजी घेत चमचमीत पदार्थ खावे असं वाटत, तर घरच्याघरी तयार करा मूग डाळीपासून स्वादिष्ट इडली.
Published by :
Team Lokshahi
Published on

मूग डाळ इडलीसाठी लागणारे साहित्य:

पिवळी मूग डाळ

तेल

मोहरी

उडीद डाळ

हिंग

कढीपत्ता

हिरवी मिरची

गाजर

दही

मीठ

मूग डाळ इडली बनवण्याची कृती:

सर्वप्रथम पिवळी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर एक भांड घेऊन त्यात गरम पाणी घेऊन पिवळी मूग डाळ गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी ओता आणि हिरवी मिरची बारीक चिरुन भिजवलेली मूग डाळ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची मिक्सरला लावा. नंतर ते मिश्रण एका खोलगट भांड्यात कढून घ्या आणि त्यात किसलेला गाजर, दही, धणे, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्रित करून घ्या.

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता हे सर्व टाकून मंद आचेवर परतून घ्या. तयार केलेल्या मूग डाळीच्या पीठात पॅनमध्ये तयार केलेली फोडणी मिसळा. त्यात थोडे पाणी घालून पीठ छान प्रकारे मिक्स करा. इडलीच्या भांड्याला तेल लावून थोडे थोडे करून ते पीठ इडलीच्या भांड्यात टाका.

भांड्याला तेल लावल्यामुळे इडली भांड्याला चिकटणार नाही आणि भांड्यातून इडली काढणं सोप जाईल. या नंतर तयार झालेली मूग डाळ इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे चमचमीत आणि स्वादिष्ट मूग डाळ इडलीचा आनंद तुम्ही नारळाच्य चटणीसोबत तसेच सांभरसोबत घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com