चटकदार
उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करावी? जाणून घ्या
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer) ही स्वीट डिश बहुतांश घरांमध्ये नवरात्रौत्सव, दीपावली तसंच वेगवेगळ्या व्रताच्या दिवशी आवर्जून तयार केली जाते. उपवासाच्या फराळातील हा लोकप्रिय पदार्थ आहे.
महत्त्वाची सामग्री
1/4 कप साबुदाणे
1/2 लीटर दूध
1/2 कप साखर
एका बाउलमध्ये साबुदाणे घ्या आणि स्टार्च निघेपर्यंत साबुदाणे पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर साबुदाणे तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर पॅनमध्ये थोडेसे पाणी उकळत ठेवा. पाणी उकळू लागल्याबरोबर त्यात अर्धा लिटर दूध ओता. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
दुधामध्ये १/४ कप साबुदाणे घालावे. गॅसच्या मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहा. पाच मिनिटे सामग्री शिजू द्यावी. साबुदाणे मऊ झाले आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या
दोन ते तीन मिनिटांनंतर साखर मिक्स करा. यानंतर वेलची पावडर आणि केशरच्या दोन ते तीन काड्या देखील मिश्रणात मिक्स कराव्यात.
खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खीर सर्व्ह करू शकता.