पिझ्झाची क्रेविंग होतीयं, तर घरीच बनवा झटपट पिझ्झा पॉकेट्स; जाणून घ्या रेसिपी

पिझ्झाची क्रेविंग होतीयं, तर घरीच बनवा झटपट पिझ्झा पॉकेट्स; जाणून घ्या रेसिपी

पिझ्झा पॉकेट बाजारातून ऑर्डर करण्यासोबतच तुम्ही हे घरीही सहज बनवू शकता. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ते नक्कीच आवडेल. जाणून घ्या काय आहे रेसिपी
Published on

Pizza Pockets Recipe: जर तुम्हाला काही चवदार आणि मजेदार खावेसे वाटत असेल तर पिझ्झा पॉकेट ट्राय करुन पहा. त्याची चव अप्रतिम आहे. बाजारातून ऑर्डर करण्यासोबतच तुम्ही हे घरीही सहज बनवू शकता. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ते नक्कीच आवडेल. जाणून घ्या काय आहे रेसिपी

साहित्य

मैदा - २ कप

ऑलिव्ह ऑईल - 2 टेस्पून

ड्राई अॅक्टीव यीस्ट - 1 टिस्पून

साखर - 1 टीस्पून

मीठ - ½ टीस्पून

मोझरीला चीज - किसलेले

पिझ्झा सॉस - ¼ कप

बीन्स - ¼ कप (बारीक चिरून)

सिमला मिरची - 1 (लांबीच्या दिशेने बारीक कापलेली)

स्वीट कॉर्न - ¼ कप

कोबी - ½ कप

काळी मिरी पावडर - ¼ टीस्पून

मीठ - ¼ टीस्पून

ऑलिव्ह तेल - 1 टीस्पून

कृती

पिझ्झा पॉकेट बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पीठ चाळून घ्या. आता त्यात साखर, मीठ, ड्राय अॅक्टीव्ह यीस्ट आणि ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिसळा. कोमट पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्या.

स्टफिंग तयार करा:

स्टफिंग तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यानंतर त्यात बीन्स घालून तळून घ्या. थोडे मऊ झाल्यावर त्यात कॉर्नचे दाणे, चिरलेली सिमला मिरची, चिरलेली कोबी घालून तळून घ्या. भाजी हलकी शिजल्यावर त्यात काळी मिरी आणि मीठ घालून मिक्स करा. सतत हलवत तळून घ्या आणि गॅस बंद करा.

आता पिठाचा गोळा घ्या, तो लाटून त्याचे चौकोनी तुकडे करा. याचे लहान तुकडे करून घ्या. यावर 1 चमचा स्टफिंग पसरवा. सोबत किसलेले मोझरीला चीज पसरवा. त्याच्यावर दुसरा तुकडा ठेवा. आता कडा बोटाने दाबून घ्या. त्याचप्रमाणे सर्व पिझ्झाची पॉकेट तयार करा.

आता बेकिंग ट्रेवर बटर पेपर ठेवा. ते बटरने हलके ग्रीस करा आणि नंतर सर्व पिझ्झा पॉकेट्स त्यावर ठेवा. ब्रशच्या मदतीने पिझ्झावर हलकेच तेल लावा. आता पिझ्झा पॉकेट 180 डिग्रीवर 20 मिनिटे बेक करा. थोड्या वेळाने सॉससोबतच सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com