चटकदार
Snacks from stale Chapati: शिळ्या चपातीपासून झटपट तयार करा स्वादिष्ट स्नॅक्स; जाणून घ्या रेसिपी...
अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ लोकांपर्यंत सर्वांनाच कधी न कधी जेवायचा कंटाळा येतो.
अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ लोकांपर्यंत सर्वांनाच कधी न कधी जेवायचा कंटाळा येतो. अश्या वेळी घरात शिळं जेवन राहून जातं. अश्यात तुम्ही शिळ्या चपात्यांपसून अगदी पाच मिनिटात स्वादिष्ट स्नॅक्स तयार करू शकता.
साहित्य
1 शिळी चपाती
तेल
प्रक्रिया
सर्वप्रथम शिळ्या चपातीचे 4 तुकडे करा.
एका बाजूला कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवा.
तेल गरम झालं की त्यात चपातीचे चौकोनी तुकडे सोडा.
चपातीचे तुकडे कुडकुडीत आणि सोनेरी रंगाचे झाल्यावर एका ताटाला टिशू पेपर लाऊन तुकड्यांना त्या ताटावर काडा.
शिळ्या चपातीपासून झटपट तयार होणारा हा स्नॅक्स तयार आहे.
तुम्ही हे खुसखुशीत चपातीचे तुकडे टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.