हेल्दी समजून 'हे' 5 पदार्थ तुम्ही रोज खात आहात तर सावधान; वाढवू शकतात वजन
आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि वजनावर होतो. पौष्टिक आहार घेऊन तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. मात्र, दुसरीकडे असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही हेल्दी समजून खातात परंतु ते तुमचे वजन वाढवू शकतात. हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे जाणून न घेता तुम्ही ते सेवन करत असता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या खाद्यपदार्थांमुळे तुमचे वजन वाढू शकते.
1. फ्रूट जूस (Fruit juices)
सामान्यतः असे मानले जाते की फळांचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते वजन वाढवण्यास मदत करतात. फ्रूट जूस विक्रेते फळांच्या रसांमध्ये साखर टाकतात. यामुळे त्वरीत कॅलरीज वाढू शकतात. याशिवाय, जेव्हा तुम्ही फळांचा रस काढता तेव्हा त्यातील फायबर निघून जाते आणि तुम्ही जास्त कॅलरीचे सेवन करतात.
2. ग्रेनोला बार (Granola bars)
ग्रेनोला बारकडे नेहमी हेल्दी स्नॅक म्हणून पाहिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की त्यात अनेक वेळा खूप जास्त साखर आणि फॅट आढळते. यामुळे वजन वाढू शकते. अनेक दुकानातून विकत घेतलेल्या ग्रॅनोला बारमध्ये चॉकलेट चिप्स, मध आणि इतर गोड पदार्थ मिश्रीत असते. जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते. बारशी जोडलेले न्यूट्रिशिनल लेबल वाचल्यानंतरच ते विकत घेतले पाहिजे.
3. सुकामेवा (Dried fruits)
सुकामेवा सामान्यतः आरोग्यदायी मानला जातो. पण जेव्हा फळांना वाळवले जाते तेव्हा त्यातील नैसर्गिक साखर त्यांना कॅलरींयुक्त बनवते. मूठभर ड्रायफ्रुट्स खाणेही पटकन कॅलरीज वाढवू शकतात. सुक्या मेव्याचे कमी प्रमाणात सेवन करणे चांगले.
4. पीनट बटर (Penut butters)
शेंगदाणे हेल्दी फॅट आणि प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. परंतु, पीनट बटरसाठी असेच म्हणता येणार नाही. अनेक व्यावसायिक बटर ब्रँड ते बनवण्यासाठी तेल, साखर आणि कृत्रिम घटकांचा वापर करतात. हे घटक पीनट बटरमध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.
5. स्मूदीज (Smoothies)
आपल्या आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करण्याचा स्मूदी हा एक चांगला मार्ग असू शकतो. परंतु, यामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. विशेषत: जेव्हा स्टोअरमधून विकत घेतले जाते. खूप गोड फळांपासून बनवलेले फळांचे रस, दही आणि स्मूदी यांचे वारंवार सेवन केल्याने वजन वाढू शकते.