नाश्त्याला करा कुरकुरीत आणि गरमा-गरम बटाट्याचे मेदू वडे
बटाट्याच्या मेदू वड्यांसाठी लागणारे साहित्य:
बटाटे
तेल
मीठ
तिखट मसाले
हिरवी मिरची
मोहरी
आलं-लसूण
जीरे
रवा
बटाट्याचे मेदू वडे बनवण्याची कृती:
सर्वात आधी बटाटे धुवून घ्या आणि त्याला किसून घ्या. या नंतर एक कढई घ्या आणि त्यात तेल गरम करायला ठेवा. गरम झालेल्या तेलात हिरवी मिरची, आलं-लसूण, जीरे, मोहरी, पांढरे तीळ, चिल्ली फ्लेक्स हे सर्व साहित्य भाजून घ्या. यानंतर त्यात थोडे पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला. पाणी गरम झाल्यावर त्यात किसलेला बटाटा आणि रवा घाला आणि त्यावर 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवा. यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
यानंतर तयार झालेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या आणि हाताला तेल लावून त्याचे मेदू वडा आकाराचे गोळे तयार करा. हाताला तेल लावल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही. कढईत एका बाजूला तेल गरम करून त्यात वडे एक-एक करून वडे सोडा. एका प्लेटमध्ये तयार झालेले मेदू वडे सर्व्ह करून घ्या आणि अशा प्रकारे गरमा-गरम स्वादिष्ट असे बटाट्याचे मेदू वडे खाण्यासाठी तयार आहेत.