रेड, व्हाईट सोडा! ग्रीन सॉस पास्ता कधी ट्राय केलायं का? 'ही' घ्या रेसिपी

रेड, व्हाईट सोडा! ग्रीन सॉस पास्ता कधी ट्राय केलायं का? 'ही' घ्या रेसिपी

रेड सॉस आणि व्हाईट सॉस पास्ता खाला असेलच, पण तुम्ही कधी ग्रीन सॉस पास्ता ट्राय केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा ग्रीन सॉस पास्ता...
Published on

Green Sauce Pasta Recipe : इटालियन डिश पास्ता जगभरात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. हे अनेक प्रकारच्या भाज्या, सॉसेजसह तेलात बनवले जाते. तुम्ही ते नाश्ता, दुपारचे जेवण किंवा स्नॅक्ससाठीही खाऊ शकता. ही डिश रेस्टॉरंट्सपासून घरांपर्यंत बनवली जाते. लहान मुलांपासून ते प्रौढापर्यंत सर्वांनाच खायला आवडते. पास्त्याच्या चवीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही रेड सॉस आणि व्हाईट सॉस पास्ता खाला असेलच, पण तुम्ही कधी ग्रीन सॉस पास्ता ट्राय केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा ग्रीन सॉस पास्ता...

रेड, व्हाईट सोडा! ग्रीन सॉस पास्ता कधी ट्राय केलायं का? 'ही' घ्या रेसिपी
पिझ्झाची क्रेविंग होतीयं, तर घरीच बनवा झटपट पिझ्झा पॉकेट्स; जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

१ कप पेने पास्ता

1 कप पालक

1 टीस्पून कॉर्न फ्लोअर

1 टीस्पून मीठ

1 टीस्पून काळी मिरी पावडर

1 टीस्पून ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि इतर आवडीचे मसाले

कृती :

ग्रीन सॉस पास्ता बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये २ ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा. हे पाणी उकळायला लागल्यावर पॅनमध्ये पास्ता टाका. आता गॅस मंद करून पास्ता झाकून शिजू द्या. पास्ता उकळत असताना, उर्वरित काम करा.

आता पालकाची पाने नीट धुवून स्वच्छ करा. ही पाने 3-4 वेळा पाण्याने धुवा म्हणजे सर्व घाण व माती निघून जाईल. एका भांड्यात पाणी आणि पालक टाकून गॅसवर ठेवा. पालकाला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर प्रथम पालक थंड करा, नंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवा.

आता गॅसवर पॅन ठेवा, त्यात दूध टाका आणि गरम करा. या दुधात कॉर्न फ्लोअर मिक्स करा, नंतर त्यात पालकाची पेस्ट टाका आणि मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हँड व्हिस्कर देखील वापरू शकता. मंद आचेवर चांगले मिक्स करून शिजवा. वरुन पास्ता टाका आणि 2-3 मिनिटे शिजवा. तुमचा टेस्टी आणि हेल्दी ग्रीन सॉस पास्ता तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com