व्हेज, चिकन विसरा ट्राय करा एग मंचुरियन; 'ही' घ्या सोप्पी रेसिपी

व्हेज, चिकन विसरा ट्राय करा एग मंचुरियन; 'ही' घ्या सोप्पी रेसिपी

लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना अंडी आवडतात. अंड्याची भुर्जी, उकडलेले अंडे, अंडा मसाला, एग करी आणि इतर अनेक पदार्थ त्यातून बनवले जातात.
Published on

Egg Machurian Recipe : लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना अंडी आवडतात. अंड्याची भुर्जी, उकडलेले अंडे, अंडा मसाला, एग करी आणि इतर अनेक पदार्थ त्यातून बनवले जातात. जर तुम्हालाही अंडी खाण्याची आवड असेल तर तुम्ही एग मंचुरियन जरूर ट्राय करा. याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हेज, चिकन विसरा ट्राय करा एग मंचुरियन; 'ही' घ्या सोप्पी रेसिपी
तुम्ही टेस्टी मॅक्रोनी सूप ट्राय केलायं का? जाणून घ्या रेसिपी

साहित्य

5 उकडलेली अंडी

अर्धा कप मैदा

2 अंडी व्हिनेगर,

2 चमचे सोया सॉस,

2 चमचे लाल मिरची केचप

2 कांदे

2 हिरव्या मिरच्या

चवीनुसार मीठ आणि तिखट

आवश्यकतेनुसार तेल

कृती

एग मंचुरियन बनवण्यासाठी प्रथम अंडी उकडा. यानंतर, साल काढून एका भांड्यात काढा. आता अंड्याचे 2 तुकडे करा, अंड्यातील पिवळ बलक वेगळे करा आणि पांढऱ्या भागाचे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये पीठ, मीठ आणि तिखट चवीनुसार घालून हाताने चांगले मॅश करा. मॅश केल्यानंतर त्याचे छोटे मंचुरियन गोळे बनवा. यानंतर, एका भांड्यात 3 चमचे मैदा आणि 2 अंडी घाला. नीट मिक्स करून त्यात सर्व मंचुरियन गोळे टाका.

यानंतर गॅसवर कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार मंचुरियन गोळे सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा. आणि त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे तेलात टाकून हलके तळून घ्या. यानंतर लाल मिरची केचप, सोया सॉस, व्हिनेगर घालून मिक्स करा. यानंतर मंचुरियन गोळे घालून चांगले मिक्स करा. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सजवा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com