मुलांना काही तरी चटपटीत खावसं वाटतं का? घरच्याघरी बनवा अप्रतिम क्रिस्पी हनी चिली बटाटा
क्रिस्पी हनी चिली बटाटासाठी लागणारे साहित्य:
बटाटे
मध
मीठ
सोया सॉस
तीळ
व्हिनेगर
क्रिस्पी हनी चिली बटाटा बनवण्याची कृती:
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या. यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे कुकरमध्ये मंद आचेवर पाणी ठेवून त्यात बटाटे घाला. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. बटाटे जास्त शिजवू नका त्याने ते नरम होऊन त्याचातला क्रिस्पीनेस नाहीसा होईल. उकडलेले बटाटे फ्रेंच फ्राईज प्रमाणेच कापून घ्या. एका बाजूला बाऊलमध्ये ठेचलेली लसूण, तिखट मसाले, चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी घेऊन मिश्रण छान एकत्रित करून घ्या.
यानंतर कापलेले बटाटे तयार केलेल्या मिश्रणात एकजीव करून घ्या. मंद आचेवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. यानंतर गरम तेलात कापलेले बटाटे एक एक करून सोडा आणि छान कुरकुरीत झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर गरम तेलात लसूण पाकळ्या, तीळ, व्हिनेगर आणि टोमॅटो चिली सॉस गरम करून त्यात तळलेले बटाटे टाका. नंतर ते एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊन त्यावर मध टाका आणि अशा प्रकारे क्रिस्पी हनी चिली बटाटा तयार याचा आस्वाद तुम्ही आनंदाने घेऊ शकता.