'ही' खास बिस्किट केक रेसिपी ख्रिसमस बनवेल खास; अर्ध्या तासात होईल तयार

'ही' खास बिस्किट केक रेसिपी ख्रिसमस बनवेल खास; अर्ध्या तासात होईल तयार

जर तुम्ही या ख्रिसमसमध्ये केक बनवण्याचा विचार करत असाल आणि कमी साहित्यात चांगला केक कसा बनवायचा हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Published on

Chritmas 2023 Cake Recipe : जर तुम्ही या ख्रिसमसमध्ये केक बनवण्याचा विचार करत असाल आणि कमी साहित्यात चांगला केक कसा बनवायचा हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अतिशय टेस्टी आणि सोप्या बिस्किट केकची रेसिपी सांगणार आहोत जी तुम्ही अगदी कमी साहित्यात बनवू शकता. चांगली गोष्ट म्हणजे हा केक बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही. तर, बिस्किट केकची सोपी रेसिपी जाणून घ्या

होममेड बिस्किट केकसाठी साहित्य

2 कप बिस्किटाचे तुकडे

100 ग्रॅम कोको पावडर

1 कप दूध

2 चमचे कॉर्न फ्लोअर

गार्निशिंगसाठी

1 मूठभर अक्रोड

1 मूठभर बदाम

1 मूठभर चॉकलेट चिप्स

होममेड बिस्किट केक कसा बनवायचा?

दुधासह कोको पावडर गरम करा. मिश्रण घट्ट होण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घाला, आवश्यकतेनुसार साखर घाला आणि मंद आचेवर जाड चॉकलेट सॉस होईपर्यंत गरम करा. थंड होऊ द्या.

यानंतर मिक्सरमध्ये बिस्किटांचे तुकड्यांची पेस्ट करुन घ्या. एक सपाट डबा घ्या आणि त्यात तुमच्या आवडीची बिस्किट पावडर घाला. बिस्किटांवर कोको सॉसचा जाड थर लावा आणि काही बदाम आणि अक्रोड पसरवा. सॉसवर बिस्किटांचा दुसरा थर ठेवा आणि त्यावर चॉकलेट सॉस पसरवा. यावर चॉकलेट चिप्स, नटस् किंवा इतर रंगीबेरंगी कँडी किंवा चॉकलेटने सजवू शकता. 30 मिनिटांसाठी हे मिश्रण डीप फ्रीझ करा आणि तुम्ही पूर्णपणे तयार झालेला बिस्किट केक खाण्यासाठी तयार आहात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com