उपवासात बनवा भोपळ्याची खीर; चव आणि आरोग्यासाठी फायद्याची

उपवासात बनवा भोपळ्याची खीर; चव आणि आरोग्यासाठी फायद्याची

नवरात्रीच्या ९ दिवसांत दुर्गा देवीची पूजा केली जाते. विशेषत: हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्वाचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत लोक माँ दुर्गाला नैवेद्य अर्पण करतात. एवढेच नाही तर काही लोक या काळात 9 दिवस उपवास देखील करतात. या दिवसांत तुम्ही भोपळ्याची खीर करु शकता. जी केवळ आरोग्यदायीच नाही तर चवदारही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नवरात्रीच्या ९ दिवसांत दुर्गा देवीची पूजा केली जाते. विशेषत: हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्वाचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत लोक माँ दुर्गाला नैवेद्य अर्पण करतात. एवढेच नाही तर काही लोक या काळात 9 दिवस उपवास देखील करतात. या दिवसांत तुम्ही भोपळ्याची खीर करु शकता. जी केवळ आरोग्यदायीच नाही तर चवदारही आहे.

तूप 4 टीस्पून, भोपळा 200 ग्रॅम, संपूर्ण दूध 1 कप, वेलची पावडर 1 टीस्पून, कंडेन्स्ड मिल्क 300 ग्रॅम, किसलेले खोबरे 1/2 कप, भाजलेले काजू, भाजलेले बदाम आणि पिस्ता

उपवासात बनवा भोपळ्याची खीर; चव आणि आरोग्यासाठी फायद्याची
नवरात्रीत मसालेदार साबुदाणा टिक्की बनवा आणि खा, चविष्ट रेसिपी

एका भांड्यात 3 ते 4 चमचे तूप गरम करून त्यात 200 ग्रॅम भोपळा घाला. आता साधारण ५ मिनिटे तुपात तळून घ्या. यानंतर 1 कप संपूर्ण दूध घालून दुधात भोपळा घट्ट होईपर्यंत शिजवा. यानंतर त्यात १ चमचा वेलची पावडर, ३०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क आणि १/२ कप ताजे किसलेले खोबरे घाला. गॅसची आच मध्यम ठेवा आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता काजू आणि बदाम मिक्स करा. यानंतर तुम्ही आणखी दोन चमचे तूप घाला आणि भोपळ्यात तूप मिसळेपर्यंत शिजवा. तुमचा हलवा तयार आहे.

उपवासात बनवा भोपळ्याची खीर; चव आणि आरोग्यासाठी फायद्याची
'या' नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा चाट नक्की करून बघा, चव आणि आरोग्य दोन्ही छान राहतील
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com