इतर
बनवा पालक आलू टिक्की रेसिपी
पालक, मॅश केलेले उकडलेले बटाटे, तांदळाचे पीठ आणि चुरमुरे ब्रेडचे तुकडे एकत्र करून ही स्वादिष्ट टिक्की बनवली जाते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पॅन फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता.
पालक, मॅश केलेले उकडलेले बटाटे, तांदळाचे पीठ आणि चुरमुरे ब्रेडचे तुकडे एकत्र करून ही स्वादिष्ट टिक्की बनवली जाते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पॅन फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता.
साहित्य
१ कप पालक,
१ छोटा कांदा,
१/२ टीस्पून आले-लसूण पेस्ट
१/४ टीस्पून जिरे
मीठ चवीनुसार
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ टीस्पून गरम मसाला पावडर
चिमूटभर हळद
१ टेबलस्पून तांदळाचे पीठ
२ ब्रेड साइड शिवाय
जिरे, कांदा आणि आले.लसूण पेस्ट परतून घ्या. पालक,मीठ आणि इतर मसाले घाला. पालक शिजल्यावर गॅस बंद करून पालक थंड होऊ द्या.
एका भांड्यात पालकाचे मिश्रण, उकडलेले बटाटे, तांदळाचे पीठ आणि चुरमुरे ब्रेडचे तुकडे एकत्र करा. जर मिश्रण खूप ओले असेल तर आणखी पीठ घाला. आवश्यक असल्यास अधिक मीठ घाला . मिश्रणातून लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा आणि पॅन फ्राय किंवा डीप फ्राय करा.