LPG Gas Price Cylinder Hike
LPG Gas Price Cylinder Hike

LPG च्या दरात कपात, जाणून घ्या कोणत्या शहरात कितीने स्वस्त?

व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपये झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपये झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.

जाणून घ्या LPG सिलिंडरच्या किमती किती कमी झाल्या?

मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता

दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.

चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

कोणाला फायदा होणार?

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती आहेत तशाच आहेत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Gas Price Cylinder Hike
Chess Olympiad Tournament : भारताची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकदार कामगिरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com