Lesbian Couple: एक भारतीय, तर दुसरी पाकिस्तानी; 'या' समलैंगिक जोडीची जगभरात चर्चा

Lesbian Couple: एक भारतीय, तर दुसरी पाकिस्तानी; 'या' समलैंगिक जोडीची जगभरात चर्चा

सोशल मिडियावर काहीना काही व्हायरल होत आहे आणि अशा व्हायरल गोष्टींची चर्चा तर होऊनच राहते. अशीच एक गोष्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे अंजली चक्र आणि सुफी मलिक यांची प्रेमकथा हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान अशा कुठल्याच बंधनात न अडकता या मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सोशल मिडियावर (Social Media ) काहीना काही व्हायरल होत आहे आणि अशा व्हायरल गोष्टींची चर्चा तर होऊनच राहते. अशीच एक गोष्ट सोशल मिडियावर व्हायरल (Viral ) झाली आहे. ती म्हणजे अंजली चक्र (Anjali Chakra) आणि सुफी मलिक (Sufi Malik) यांची प्रेमकथा हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान अशा कुठल्याच बंधनात न अडकता या मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघी एकमेकींना डेट करत होत्या. मात्र, आता त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. आता त्या दोघीही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. इतकंच नाही तर, सोशल मीडियावरून फोटो शेअर करत एकमेकींबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. आपण समलैंगिक आहोत, हे देखील त्या जाहीरपणे कबुल करतात. सोशल मीडियावर या दोघींचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सुफीला भेटण्यापूर्वी अंजली एका मुलाला डेट करत होती. मात्र, त्यांच्या नात्यात काही गोष्टी बिनसल्या आणि त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर सोशल मीडियाद्वारे अंजलीची ओळख सुफी मलिकशी झाली. सुफी एक कलाकार आहे, तर अंजली ही वेडिंग प्लॅनर आहे. दोघी एकमेकींशी खूप गप्पा मारू लागल्या. तेव्हाच अंजलीला कळले की, सुफी ही समलैंगिक आहे. यानंतर दोघींनी एकमेकींना भेटण्याचा निर्णय घेतला. अंजली भारतीय आणि सुफी पाकिस्तानी असली तरी, दोघी न्यूयॉर्कमध्ये राहतात.

काही काळापूर्वी बोल्ड फोटोशूट करत आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची कथा सांगणारी ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. अंजली चक्र ही मूळची भारतीय हिंदू मुलगी आहे आणि सुफी ही मूळची पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे.

Lesbian Couple: एक भारतीय, तर दुसरी पाकिस्तानी; 'या' समलैंगिक जोडीची जगभरात चर्चा
Shooting Competition : विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : मैराज खानला मिळालं ऐतिहासिक सुवर्णपदक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com