जाणून घ्या कशी करावी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी?

जाणून घ्या कशी करावी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी?

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.

जन्माष्टमीचे व्रत कसे करावे?

जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.

जाणून घ्या कशी करावी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी?
जन्माष्टमी स्पेशल : घरच्या घरी बनवा रुचकर दहीकाला; ही घ्या सोपी रेसेपी

व्रताची सांगता कशी करावी?

या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करावा. दहीकाल्याचा नैवेद्य दाखवावा.

जाणून घ्या कशी करावी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी?
दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांची तयारी पूर्ण; थरांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या पथकाला लाखोंची बक्षीसे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com