जन्माष्टमी स्पेशल : घरच्या घरी बनवा रुचकर दहीकाला; ही घ्या सोपी रेसेपी

जन्माष्टमी स्पेशल : घरच्या घरी बनवा रुचकर दहीकाला; ही घ्या सोपी रेसेपी

जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाला भोग नैवेद्य म्हणून दहीकाला बनवला जातो. त्याला गोपाळकाळा असेही म्हटले जाते. गोकुळाष्टमीच्या सणाचे महत्व भारतीय संस्कृतीत अनन्य साधरण आहे. संपूर्ण भारतभरात रात्री बारा वाजण्याची वाट लोक आतुरतेनं पाहतात आणि मग आपल्या लाडक्या गोविंदाच्या जन्माच्या उत्सव साजरा करतात. जन्माष्टमीला कृष्णाला दही, दूधाचा नैवेद्य दाखवला जातो. तर जाणून घेऊया याची सोपी रेसिपी
Published on

साहित्य

एक कप चुरमुरे

एक कप राजगिरा लाह्या

एक कप साळीच्या लाह्या

दोन कप ज्वारीच्या लाह्या

एक कप जाड पोहे

एक कप ताक

एक कप दही

अर्धा कप दूध

दोन हिरव्या मिरच्या

डाळिंब, पेरु, काकडी

एक इंच आले

ओल्या नारळाचे काप

मीठ

साखर

जिरे, हिंग

कृती

सर्वप्रथम लाहया चाळून हलक्या हाताने भाजून घ्यावा त्यात चुरमुरे आणि पोहे एकत्र करुन घ्यावे. आता एका भांड्यात अर्धा कप दूध, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालून ताक बनवून घ्या. त्यानंतर लाह्या आणि चुरमुरे मिश्रणात लागेल तसे ताक घालून भिजवत जावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. त्यानंतर आले आणि दोन हिरव्या मिरच्यांची पेस्ट यामध्ये घालावी. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, ओल्या नारळाचे काप, पेरुचे तुकडे, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे सर्व मिक्स करुन, शेवटी तुपामध्ये फोडणी द्या मग आणखी दहीकाला खमंग लागले.

जन्माष्टमी स्पेशल : घरच्या घरी बनवा रुचकर दहीकाला; ही घ्या सोपी रेसेपी
पावसाळ्यात काही खास खावेसे वाटत असेल तर घरीच बनवा स्वादिष्ट हैदराबादी बैंगन
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com