उन्हाळ्यामध्ये गाडीत जास्त पेट्रोल भरावे की नाही ? मेसेज होतोय वायरल...
आपल्याकडे दरवर्षी उन्हाळा चांगलाच कडक असतो. यंद्या तर सर्वत्र सरासरी 40 डिग्री पेक्षा जास्त ऊन पडते आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होतो आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, उन्हाळ्यामध्ये गाडीमध्ये जास्त पेट्रोल भरू नये अन्यथा स्फोट होण्याची शक्यता असते. हा मेसेज इंडियन ऑइल च्या नावाने दिला जात असून हा खरा आहे की खोटा याबाबत अद्याप स्पष्ट नाही.
सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत इंडियन ऑइलचे ब्रँडिंग आणि हिंदीमध्ये मजकूर देण्यात आला आहे. या मजकूरात लोकांना उन्हाळ्यात जास्तीत जास्त संभाव्य मर्यादेपर्यंत इंधन टाक्या भरल्यास वाहनाच्या संभाव्य स्फोटाबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. टाकी अर्धी भरून त्यातील गॅस बाहेर पडू द्या, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं.या आधी २०१८ मध्ये अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल झाला होता. तेव्हा इंडियन ऑइलने ट्विट करून स्पष्ट केले होते की कंपनीने असा कोणताही प्रकारचा सल्ला दिला नाही. हा मेसेज खोटा आहे.
इंडियन ऑइल ही पेट्रोलियम क्षेत्रातील नामांकित कंपनी असून, भारतामध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीच्या पेट्रोल पंपातूनच पेट्रोल अथवा डिझेलमध्ये पसंत करतात.