Sleep
SleepTeam Lokshahi

तुम्ही किती तास झोपता? जाणून घ्या वयानुसार किती तासांची झोप आवश्यक

निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप (Sleep) घेणे खूप महत्वाचे आहे.
Published by :
Published on

निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप (Sleep) घेणे खूप महत्वाचे आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि नैराश्य इत्यादी अनेक आजारांचा धोका वाढतो. बरेच लोक आहेत, जे व्यस्त वेळापत्रकामुळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. अशा परिस्थितीत जाणून घ्या कोणत्या वयोगटातील लोकांना किती तासांची झोप आवश्यक आहे.

Sleep
चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे करा सेवन

झोप का आवश्यक आहे?

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ रात्री झोपणे पुरेसे नाही, याशिवाय तुम्ही कधी झोपता, किती वेळ झोपता आणि तुमची झोप गुणवत्ता कशी आहे. हे देखील महत्त्वाचे आहे.

रात्री झोप न लागणे, दिवसा झोप न लागणे, थकवा येणे, मूड खराब होणे. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास काय होईल?

झोपेच्या अभावामुळे मुलांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे सामान्य वाढ आणि विकासात अडथळा येतो.

झोपेच्या कमतरतेमुळे मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की, शाळेतील कामगिरी कमी होणे, सकाळी लवकर उठण्यात अडचण, चिडचिड, मूड बदलणे, नैराश्य इ.

Sleep
उसाचा रस पितांना ही काळजी घ्या, अन्यथा उसाचा रस पिणे पडेल महागात

ज्येष्ठांना कमी झोप लागते का?

काही संशोधनानुसार झोपेची गरज वयानुसार बदलत नाही, परंतु आवश्यक झोप घेण्याची क्षमता वयानुसार कमी होत जाते. वृद्ध प्रौढांना त्यांच्या आजारांमुळे आणि औषधांमुळे झोपण्याची क्षमता कमी असते. वयाबरोबर झोपेची गुणवत्ताही कमी होऊ लागते. वृद्धांच्या झोपेची गुणवत्ता खूपच कमी असते. यामागे निद्रानाश, रेस्टलेस लेग सिंड्रोम, स्लीप अँप्निया आणि मिडनाइट युरिनेशन इत्यादी अनेक कारणे आहेत.

वयानुसार किती तास झोप आवश्यक आहे:

नवजात मुले - 11 ते 14 तास झोप

प्री-स्कूल(3-5 वय) = 10 ते 13 तास झोप

मुले (6-13 वय) = 9 ते 11 तास झोप

किशोरवय (14-17 वय) = 8 ते 10 तास झोप

प्रौढ (18-60 वय ) = 7 ते 9 तास झोप

60 वर्षांवरील वृद्ध = 6 ते 8 तास झोप

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com