Weekly Horoscope
Weekly HoroscopeTeam Lokshahi

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य | वाचा कसा असेल तुमचा हा आठवडा ?

हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा 12 जून ते 19 जून या आठवड्यातील तुमचे भविष्य.
Published by :
Team Lokshahi
Published on

मेष (Aries Horoscope)

आपले काम प्रामाणिकपणे करावे यातच फायदा आहे. माणसे जोडण्याचे लाभ. एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला अडचणीच्या वेळी मदत केल्याने तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. शब्द जपून वापरणे यामुळे वादाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.

वृषभ (Taurus Horoscope)

या राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय फायद्याचे राहतील. काही लोकांसाठी आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबासह वेळ घालवायला मिळेल. वाद टाळणे आणि वास्तवाचे भान राखणे हिताचे.

मिथुन (Gemini Horoscope)

तुमचे आरोग्य चांगले राहील. इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचा हा आठवडा चांगला असणार आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल.

कर्क (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य राहील. तुमचे कौतुक होईल. शुभ कार्याचा योग आहे. घरच्याची आणि स्वत:ची तब्येत जपणे. संवादातून प्रश्न सुटतील. जोडीदाराला वेळ देणे. व्यवसायात बरकत असणार आहे.

Weekly Horoscope
Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य | वाचा कसा असेल तुमचा 'हा' आठवडा ?

सिंह (Leo Horoscope)

स्वत: वर संयम ठेवा. कोणत्या कामामध्ये घाई करणे टाळा. काही लोक या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील. आरोग्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही. राशीच्या लोकांना प्रेम जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कन्या (Virgo Horoscope)

कामाच्या ठिकाणी तुमची चांगली कामगिरी तुमच्या वरिष्ठांना मोहित करेल. स्वत:ची तब्येत जपा. वाद टाळणे. शब्द जपून वापरणे. वाहन जपून चालवा. गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. घरच्यांना वेळ देणे. नातेसंबंध वाढतील.

तूळ (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी त्यांच्या प्रेमसंबंध आणि विवाहाचे योग आहेत. तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न कराल. नियंत्रित आहाराने तुमचे आरोग्य चांगले राहील. वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे. घरच्यांना वेळ देणे. सातत्याने केलेले प्रयत्नांना यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

राशीच्या लोकांसाठी आठवडा चांगला असेल. तुमच्या कंपनीलाही फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इच्छित नोकरी मिळेल. क्षमता ओळखून जबाबदारी स्वीकारणे. नवी कौशल्य शिकणे फायद्याचे असेल. विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

धनु (Sagittarius Horoscope)

व्यावसायिक जीवनात कोणताही नवीन प्रकल्प हाती घेण्याची तयारी करावी लागेल. स्वत:वर संयम ठेवा. वाहन जपून चालवणे. नियम आणि कायदे पाळणे. तब्येत जपणे. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ. वाद होणार नाही याची काळजी घेणे.

मकर (Capricorn Horoscope)

तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबातील वडीलधारी साथ देतील. या आठवड्यात तुम्ही दीर्घकाळानंतर तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. आर्थिक व्यवहारांमध्ये भर देणे. घरच्यांना आणि जवळच्यांना वेळ देणे. मित्रमैत्रिणींशी भेट होईल. हुशारीने परिस्थितीचा सामना करणे.

कुंभ (Aquarius Horoscope)

राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचे प्रेम जीवन खूप उत्साही वाटेल. तब्येतीची काळजी घेणे. बाहेरचे खाणे टाळावे. घरच्यांसाठी वेळ काढावा. संवाद साधल्याने वाद होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी माणसं जपणे हिताचे. नोकरीच्या संधीचे मार्ग मोकळे असतील.

मीन (Pisces Horoscope)

राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक जीवनात अतिआत्मविश्वास हानिकारक ठरू शकतो. खूप दिवसांनी जुन्या मित्रांची भेट होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. कष्टाशिवाय पर्याय नाही. हुशारीने समतोल राखणे गरजेचे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.

Weekly Horoscope
weekly Horoscope | साप्ताहिक राशीभविष्य वाचा कसा असेल तुमचा हा आठवडा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com