अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय !

अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय !

Published by :
Published on

साईवास्तु विशेष

आपली नोकरी आणि उद्योगधंदा याची तारेवरची कसरत आज आपण गेली वर्षभर पाहत आहोत. सुरुवातीला वर्क फ्रॉम होम नंतर ऑफिस आणि आता परत वर्क फ्रॉम होम असा खडतर प्रवास प्रत्येकजण जिकरिन करत आपली मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतोय.

पण आता बस झालं….खुप झालं असं म्हणतं, त्या परिस्थितीत तग धरु पाहतोय. सर्व सोंग माणूस घेऊ शकतो, पण पैशाच सोंग घेऊ शकत नाही. कित्येक जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलय तर कित्येक जणांना आपला उद्योगधंदा बंद करायची पाळी आलीय. आपण ज्या जीवन शैलीमध्ये जगतोय तिथे जे खर्च आहेत ते तर करावेच लागतात. अशा बिकट परिस्थितिमध्ये जिथे काहीच सुचत नाही, तिथे निदान मुलभुत गरजा तरी भगतायत का ? आपल्याकडे असली नसलेली सर्व पूंजी संपत चाललीय आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिलेत त्यांच्याकडून परतफेड करायच नावच घेतलं जात नाही आहे. त्यामुळे पैसा अडकून पड़लाय त्याची रिकव्हरी होत नाही आहे. याला एकमेव कारण म्हणजे वास्तुमधला अग्नि बिघडण. आग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटीरियर असणे हे कारण आहे.

दुसर कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होण. पाण्याचा साठा आग्नेय कोनात असण किंवा आग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असण. बऱ्याचवेळा आग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफार्म काळ्या ग्रेनाइटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो. उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वीतत्व निर्माण झाल तर, तुम्ही केलेल्या परिश्रमांचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही. पैसा अडकून राहतो. तसेच आग्नेय बिघडली की वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो.

आपल्या वास्तुच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो. वास्तु म्हणजे एका तबकड़ी सारखी असते, एक बाजु बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो.

उपाय काय ?

  • उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापना करुन श्रीमहालक्ष्मीची प्रतिमा लावावी.
  • आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आणि आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येईल अशी ठेऊ नका.
  • आपल्या वास्तुमध्ये कधीही भांडणतंटे, मोठ्या आवाजात बोलण टाळा.
  • कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकण टाळा.
  • आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बीजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा.
  • घरात जाळ्याजळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा.
  • जुनी बंद पडलेली घड्याळ, टाइप राइटर, बिघडलेल इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा.

घरच्याघरी करता येतील असे सोपे उपाय करुन आपला अभिप्राय नक्की कळवा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com