Shardiya Navratri : घटस्थापना म्हणजे काय?
घटस्थापना, नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा केली जाते.
नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे. कलश हे गणेशाचे रूप आहे, देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे.
घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा. या ठिकाणी दोन इंच मातीत वाळू आणि सप्तामृत कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळून पसरवून घ्या. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा. कलशाला धागा बांधा.
नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
रविवार, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना केली जाईल. सकाळी 06:30 ते 08:47 असणार आहे.
नवरात्रीच्या तिथी
15 ऑक्टोबर 2023 - प्रतिपदा तिथी - देवी शैलपुत्री
16 ऑक्टोबर 2023 - द्वितीया तिथी - देवी ब्रह्मचारिणी
17 ऑक्टोबर 2023 - तृतीया तिथी - देवी चंद्रघंटा
18 ऑक्टोबर 2023 - चतुर्थी तिथी - देवी कुष्मांडा
19 ऑक्टोबर 2023 - पंचमी तिथी- देवी स्कंदमाता
20 ऑक्टोबर 2023 - षष्ठी तिथी - देवी कात्यायनी
21 ऑक्टोबर 2023 - सप्तमी तिथी- देवी कालरात्री
22 ऑक्टोबर 2023 - दुर्गा अष्टमी- देवी महागौरी
23 ऑक्टोबर 2023 - महानवमी- शारदीय नवरात्रीचा उपवास.
24 ऑक्टोबर 2023 - दशमी तिथी - देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन
वरील सर्व बाबी लोकशाही न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही न्यूज चॅनेल कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.