Shardiya Navratri 2023 : कधी आहे घटस्थापना? जाणून घ्या; शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार असून सोमवार, 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पहिली असते ती चैत्र नवरात्री तर दुसरी असते शारदीय नवरात्री.
नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
रविवार, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना केली जाईल. सकाळी 06:30 ते 08:47 असणार आहे.
लवकर उठून स्नान करा
एक मातीचे भांडे घ्या आणि त्यामध्ये माती घेऊन त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य घाला.
चौरगावर लाल वस्त्र अंधरून त्यावर दुर्गा देवीचा फोटो ठेवा
त्यासोबत एक तांब्याचा कलश ठेवा. त्या कलशात स्वच्छ पाणी भरुन त्यात फुलं, गंध, एक रूपाया, अक्षता, दूर्वा टाका.
कलशावर पाच आंब्याची पानं ठेवा आणि त्यावर एक नारळ ठेवा.
कुंकवाने नारळावर टिळक लावा
त्यानंतर मनोभावे पूजा करुन देवीची आरती करा.
नवरात्रीच्या तिथी
15 ऑक्टोबर 2023 - प्रतिपदा तिथी - देवी शैलपुत्री
16 ऑक्टोबर 2023 - द्वितीया तिथी - देवी ब्रह्मचारिणी
17 ऑक्टोबर 2023 - तृतीया तिथी - देवी चंद्रघंटा
18 ऑक्टोबर 2023 - चतुर्थी तिथी - देवी कुष्मांडा
19 ऑक्टोबर 2023 - पंचमी तिथी- देवी स्कंदमाता
20 ऑक्टोबर 2023 - षष्ठी तिथी - देवी कात्यायनी
21 ऑक्टोबर 2023 - सप्तमी तिथी- देवी कालरात्री
22 ऑक्टोबर 2023 - दुर्गा अष्टमी- देवी महागौरी
23 ऑक्टोबर 2023 - महानवमी- शारदीय नवरात्रीचा उपवास.
24 ऑक्टोबर 2023 - दशमी तिथी - देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन