Shani Vakri 2023 : शनीची चाल होणार उलटी; 'या' राशींना बसेल फटका
Shani Vakri 2023 : शनिदेव 17 जूनपासून उलटी चाल सुरू करणार आहेत. शनीची ही चाल अनेकांच्या आयुष्यात उलथा-पालथ घडवू शकते. जेव्हा एखादा ग्रह मागे पडतो तेव्हा त्याला त्या ग्रहाची उलटी चाल असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर शनीच्या वक्रदृष्टीने प्रतिकूल परिणाम पडतो. शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे? जाणून घ्या
शनि प्रतिगामी 2023 तारीख
17 जून 2023 रोजी रात्री 10.56 वाजता शनीच्या उलटी चालीस सुरुवत होईल आणि 4 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12.31 पर्यंत राहील. शनीच्या प्रतिगामी कालावधीचा एकूण कालावधी 140 दिवस असेल.
'या' राशींवर शनीचा होणार प्रभाव
कर्क : या राशीवर शनीच्या प्रतिगामीपणामुळे तुमच्या अडचणी वाढतील. आर्थिक स्थिती खूप वाईट असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता वाढेल. कामाच्या ठिकाणी काही लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरीत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, पण यश मिळण्याची शक्यता कमी असेल. मन अस्वस्थ होईल. आरोग्यही चांगले राहणार नाही. काही वाईट बातम्या ऐकायला मिळतील. या काळात सावध राहून शनिदेव आणि भगवान शिव यांची खऱ्या मनाने पूजा करावी, हाच उपाय तुम्हाला तारणार आहे.
वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार नाही. आरोग्यापासून आर्थिक जीवनापर्यंत त्याचे वाईट परिणाम दिसून येतील. कोणत्याही रोगाने प्रभावित होऊ शकतात. काहीतरी चोरीला जाऊ शकते. पैशाच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. या काळात कोणावरही डोळेझाकपणे विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला जातो.