वर्षातील पहिली एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

वर्षातील पहिली एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व कार्य सफल होतात, असे मानले जाते, म्हणून या एकादशीला सफला एकादशी म्हणतात.
Published on

Saphala Ekadashi 2024 : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व कार्य सफल होतात, असे मानले जाते, म्हणून या एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. सफला एकादशी ही या वर्षातील पहिली एकादशी आहे. यावेळी सफला एकादशी 7 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. सफला एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

सफला एकादशीचा शुभ मुहूर्त

पौष महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला सफाला एकादशी साजरी केली जाईल. कॅलेंडरनुसार, सफला एकादशी 7 जानेवारी रोजी सकाळी 12:41 वाजता सुरू होईल आणि 8 जानेवारी रोजी सकाळी 12:46 वाजता समाप्त होईल. 8 जानेवारी रोजी पारणाची वेळ सकाळी 7.15 ते 9.20 अशी असेल.

सफला एकादशीची पूजा पद्धत

सफला एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना धूप, दीप, फळे आणि पंचामृत इत्यादी अर्पण करावे. भगवान विष्णू यांची पूजा नारळ, सुपारी, आवळा, डाळिंब आणि लवंग इत्यादींनी करावी. या दिवशी रात्री जागरण करून श्री हरिच्या नामस्मरणाचे मोठे महत्त्व आहे. व्रताच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून व दान देऊन उपवास सोडावा.

सफला एकादशीचे महत्त्व

मान्यतेनुसार, सफला एकादशीच्या रात्री जागरण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर पूजा, हवन, भांडार इत्यादींचे आयोजन करतात. या दिवशी गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. सफाळा एकादशीचे शुभ व्रत पूर्ण विधीपूर्वक केल्याने मनुष्याला मृत्यूनंतर विष्णूची प्राप्ती होते. यासोबतच या व्रतामुळे मानवी जीवनात आनंदही येतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com