Nagpanchami 2023 : आज नागपंचमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व
यंदा नागपंचमीचा सण आज म्हणजेच (21 ऑगस्ट 2023 रोजी) आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात.
नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात.काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात.श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.
मुहूर्त
पंचमी तिथी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे 5.53 ते 8.30
महत्व
नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे लवकर दूर होतात. तसेच, जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम लांब जातात. हिंदू धर्मात नाग पंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख-समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी. यामुळे कार्ल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.