Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला यंदा चुकूनही घालू नका काळ्या रंगाचे कपडे; जाणून घ्या कारण

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला यंदा चुकूनही घालू नका काळ्या रंगाचे कपडे; जाणून घ्या कारण

मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. परंतु, यंदा काळा कपडे न घालण्याचा सल्ला दिला जात आहे.
Published on

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती यंदा 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळाचे लाडू दिले जातात. यानिमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. परंतु, यंदा काळा कपडे न घालण्याचा सल्ला दिला जात आहे. यामागील कारण नेमकं काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यंदा काळा रंग वर्ज्य

पूर्वीपासून संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो. परंपरेनुसार, संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असत त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करत नाहीत. यंदा संक्राती देवीने काळ्या रंगाते वस्त्र परिधान केलेले आहे. यामुळेच मकर संक्रांत 2024 मध्ये काळा रंग वर्ज्य आहे. यामुळे यंदा संक्रातीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही. संक्रांती दिवशी काळे रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे शरीर उबदार राहते. परंतु, यंदा काळा रंग वर्ज्य असल्याने थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे घालावेत.

काय आहे कथा?

फार वर्षापुर्वी संकासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. या संक्रांतीदेवीने संकारसुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांती दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com