Shrawan 2023 : रुद्राभिषेकाने पूर्ण होतील सर्व इच्छा, जाणून घ्या योग्य पद्धत

Shrawan 2023 : रुद्राभिषेकाने पूर्ण होतील सर्व इच्छा, जाणून घ्या योग्य पद्धत

रुद्राभिषेक हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा विधी मानला जातो. रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. परंतु, नियमानुसार रुद्राभिषेक केल्यावरच त्याचे फळ मिळेल.
Published on

Rudrabhishek : भगवान शंकराची आराधना, उपासना आणि व्रतासाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण हा पवित्र महिना मानला जातो आणि हा भोलेनाथांचा आवडता महिना आहे. अशा वेळी या काळात रुद्राभिषेक केल्यास विशेष फळ मिळते. रुद्राभिषेक हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा विधी मानला जातो, यामध्ये शिवलिंगावर श्रद्धेने अभिषेक केला जातो. रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. परंतु, नियमानुसार रुद्राभिषेक केल्यावरच त्याचे फळ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया रुद्राभिषेकासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि ते करण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

Shrawan 2023 : रुद्राभिषेकाने पूर्ण होतील सर्व इच्छा, जाणून घ्या योग्य पद्धत
अधिक महिन्यात करा फक्त 'या' 4 गोष्टी, लक्ष्मी-नारायणची तुमच्यावर सदैव राहिल कृपा

रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य

तुम्ही स्वतः रुद्राभिषेक घरी करू शकता किंवा रुद्राभिषेक पुजार्‍यामार्फतही करून घेऊ शकता. रुद्राभिषेकासाठी गाईचे तूप, चंदन, सुपारी, धूप, फुले, बेलपत्र, पान, चंदन, सुपारी, कापूर, मिठाई, फळे, मध, दही, दूध, सुका मेवा, गुलाबपाणी, पंचामृत उसाचा रस, चंदन, गंगाजल, शुद्ध पाणी, सुपारी, शृंगी इत्यादींची आवश्यकता असेल.

रुद्राभिषेकाची पद्धत

- रुद्राभिषेकासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवा आणि तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे.

- सर्व प्रथम शृंगीमध्ये गंगाजल टाकून अभिषेक सुरू करा. त्यानंतर उसाचा रस, मध, दही, दूध, पाणी, पंचामृत इत्यादी द्रव्यांनी शिवलिंगाला अभिषेक करावा.

- रुद्राभिषेकाच्या वेळी महामृत्युंजय मंत्र 'ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्...' चा जप करत राहा

- यासोबत तुम्ही शिव तांडव स्तोत्र, ओम नमः शिवाय किंवा रुद्र मंत्राचा जप करू शकता.

- शिवलिंगावर चंदनाची पेस्ट लावा. सुपारी, बेलपत्र, पान इत्यादी अर्पण करा आणि भोग अर्पण करा.

- शिवलिंगाजवळ धूप दिवे लावावेत.

- आता भगवान शिवच्या मंत्राचा १०८ वेळा जप करा आणि कुटुंबासह आरती करा.

- रुद्राभिषेकाचे पाणी एका भांड्यात गोळा करून ठेवा आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरावर शिंपडा.

- हे पाणी प्रसाद म्हणून घ्या. यामुळे रोग आणि दोष दूर होतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com